कोल्हापूर पॅसेंजर ट्रॅकबाहेर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

मिरज - सांगली- सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील नोकरदार व विद्यार्थ्यांची जणू जीवनवाहिनी ठरलेली सातारा- कोल्हापूर पॅसेंजर प्रवाशांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहत आहे. वेळापत्रक वारंवार ढासळल्याने अडीच-तीन हजार प्रवाशांना मनस्ताप होत आहे. पॅसेंजर पहाटे ५.२० वाजता साताऱ्यातून सुटते. कोल्हापूरपर्यंत तेवीस स्थानकांतील प्रवासी तिच्यावर अवलंबून आहेत. 

सांगली- मिरजेत तुडुंब भरते. जयसिंगपूर, रुकडीनंतर  पाय ठेवायला जागा नसते. शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी कोल्हापूरला जातात. नोकरीसाठी कोल्हापूरला जाणाऱ्या हजारो प्रवाशांनाही तिच्याशिवाय पर्याय नाही.

जयसिंगपूर-रुकडी येथून शेकडो महिला गांधीनगर व कोल्हापुरात कामावर जाण्यासाठी प्रतीक्षेत असतात.  वेळेत कोल्हापुरात पोहोचण्यासाठी ती खूपच लोकप्रिय आहे. महालक्ष्मी, जोतिबा दर्शनासह नैमित्तिक कामांसाठी कोल्हापूरला जाणाऱ्यांनाही उपयुक्त ठरते. सध्या आठवड्यातून एक-दोन वेळा सरासरी अर्धा तास उशिरा धावत आहे. गेल्या गुरुवारी (ता.१६) तब्बल तीन तास उशिरा धावत होती. साताऱ्याजवळ इंजिन फेल झाल्याने सांगलीतून वेगळे इंजिन पाठवावे लागले. हजारो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. एसटीचा आधार घ्यावा लागला. तत्पूर्वी २९ जुलैरोजीही अडीच-तीन तास उशिरा धावली होती.

पॅसेंजरच्या मिनिटा-मिनिटांच्या वेळापत्रकावर प्रवासी कामाचे नियोजन करतात. तिच्यासाठी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस जयसिंगपुरात थांबवून ठेवली जाते. मात्र ती काही मिनिटे लेट झाली तरी कोयना पुढे सोडली जाते. परिणामी पॅसेंजर मिरजेत येऊन अडकते. कोयनानंतरच हिरवा सिग्नल मिळतो. यात वीस-पंचवीस मिनिटांचा विलंब होतो.

इंजिनातील बिघाड, एक्‍स्प्रेस गाड्यांसाठी ट्रॅक खुला ठेवणे, मध्यरात्री पुण्यातून येण्यास वेळ होणे अशी कारणे समोर येत आहेत. मिरजेतून सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत दुसरी गाडी नाही. सांगलीच्या प्रवाशांना हीदेखील सोय नाही.

नोकरदारांचे हाल - संगमेश्‍वर दुधाणी
नोकरीसाठी या पॅसेंजरने दररोज मिरज-कोल्हापूर प्रवास करणारे संगमेश्‍वर दुधाणी म्हणाले,‘‘अनेक वर्षे या गाडीने प्रवास करतो. सांगली-मिरजेतील नोकरदारांसाठी जणू ती मुंबईची लोकलच आहे. सध्या बिघडणारे वेळापत्रक प्रवाशांना डोकेदुखी ठरले आहे. शाळा-महाविद्यालयांत किंवा कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याविषयी  साशंकता वाटते. गाडीच्या विलंबाची नेमकी कारणेही रेल्वे स्पष्ट करत नाही.’’ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur Passenger Issue