व्हिडिओ ः शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचे श्राद्ध

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व सतरावे गुंफन सद्भावना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना कर्नाटकात जासण्यास मज्जाव केलेल्यामुळे शिवसेनेच्यावतीने दुधगंगा नदीवर कर्नाटक सरकारचे श्राध्द घालण्यात आले. जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व सतरावे गुंफन सद्भावना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना कर्नाटकात जासण्यास मज्जाव केलेल्यामुळे शिवसेनेच्यावतीने दुधगंगा नदीवर कर्नाटक सरकारचे श्राध्द घालण्यात आले. जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

<

>

हे पण वाचा - काम कुठ करता ? उत्तर : ब्रस्थानात..​

यावेळी विजय देवणे म्हणाले, इदलहोंड (जि. बेळगाव) येथे होणाऱ्या १७ व्या गुंफन सद्भावना साहित्य संमेलनास साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ. श्रीपाल सबनीस यांचे सहसंयोजक व मराठी साहित्यिकांना प्रवेश बंदी करण्यात आली. या देशात भाषा व प्रांतावर मत मांडण्याचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कर्नाटक सरकारने या व्यक्तीस्वातंत्र्यावर आघात केला आहे. बेळगांव, बिदर, भालकी, कारवार, निपाणीसह २० लाख मराठी माणसांचा अपमान केला आहे. शिवसेनेकडून याचा निषेध म्हणून महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर दूधगंगा नदीच्या पात्राजवळ कर्नाटक सरकारचे आम्ही श्राध्द घातले आहे. 

हे पण वाचा - सॅकमधून केला जातो हा काळा धंदा....

कर्नाटक सरकारची स्वातंत्र्यानंतरची ही दडपशाही बरोबर नाही. निपाणी येथे होणाऱ्या साहित्य संमेलनास परवानगी द्यावी.
 आंदोलनात सुजित चव्हाण, शिवगोंड पाटील, अशोक पाटील, विराज पाटील, राजू यादव,  विनोद खोत, विद्या गिरी, हर्षल सुर्वे, संदीप पाटील, अभिषेक देवणे, मंजीत माने, सागर पाटील आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolhapur shiv sena protest for karnataka government opposed