Diwali 2019 : अशी ही दिवाळी महिलांच्या आयुष्यात आनंद देऊन जाते (व्हिडिओ)

Kolhapur womens make Eco friendly Diwali Lantern
Kolhapur womens make Eco friendly Diwali Lantern

कोल्हापूर : दिवाळी म्हटलं की लख्ख दिव्यांचा प्रकाश, रंगबिरंगी पणत्या, आकाशकंदील यांनी घरदार  प्रज्वलित करून प्रकाशमय असं वातावरण दिवाळीत तयार होते. दिवाळी सणात घराच्या जगमगातासाठी महत्त्वाचे स्थान असलेल्या आकाश कंदिलाची अनेक व्हरायटी यावर्षी बाजारात दाखल झाले आहेत. पर्यावरणाची जोड देत कापडी आणि कागदी आकाशकंदील याची मागणी यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे.

दिवाळीचा सण एक वेगळाच सोहळा असतो. प्रत्येक जण हा सण आपापल्या परीने साजरा असतात. उटणे, पणती, आकाशकंदील, सुगंधी फुले अक्षरशा वातावरण प्रसन्न होऊन जात असते. या वातावरणामध्ये सुंदर नक्षीदार, रंगबिरंगी आकाश कंदील त्यामध्ये विद्युत दिवे यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसरात झगमगाट दिसते.

अश्याच  वेगवेगळ्या आकाराचे आकाशकंदील सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. या वर्षीची दिवाळी साजरी होण्यासाठी बाजारात लक्षवेधी कागदी आणि कापडी आकाश दिवे पहावयास मिळत आहेत. दिवाळी केवळ सण साजरा करण्यापुरती न राहता अनेकांच्या आयुष्यात अर्थार्जन निर्माण करणारी अशी ठरते. दिवाळीच्या निमित्ताने अनेक वस्तूंची खरेदी होते कपडे आकाश कंदील पासून ते सोन्याचे दागिने पर्यंत अनेक जण यानिमित्ताने खरेदी करतात दिवाळी पार्श्‍वभूमीवर अनेकांना बोनस मिळतो. हा बोनस दिवाळी सण साजरा करण्यासाठी त्यांना आधार ठरतो.



दिवाळीच्या निमित्ताने अनेकांना ही रोजगार उपलब्ध होतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराला दुकानांना मोठ्याप्रमाणात झगमगाट होतो यामध्ये  विद्युत रोषणाई ते आकाश कंदील चा मोठ्या प्रमाणात वापर होतो. दिवाळी आकाश कंदील याचे एक वेगळं नातं असतं. गेल्या काही वर्षापासून असणारे प्लास्टिक आणि चायनीज आकाशकंदील आता हळूहळू प्रबोधनामुळे त्याची विक्री कमी होऊ लागली आहे. त्यामुळे यावर्षी कागदी, कापडी वेगळ्या प्रकारचे आकाश दिवे तयार करण्यासाठी अनेक महिलांच्या हाताला काम मिळाले मिळाले आहे. कोणतीही जात नाही, धर्म नाही, पंथ न मानता एकत्र येऊन केवळ आकाशकंदील तयार न होता एक मैत्रीचा घट्ट धागा यानिमित्ताने तयार होतो.

आज मोठ्या संख्येने या माध्यमातून संघटितपणे या क्षेत्रात महिला उतरल्या आहेत आणि अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करत आहेत.

पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यात आम्हालाही आनंद होतो. हे कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा आकाशकंदील करण्यावर आम्ही भर दिला आहे. - नाजीया मुल्लाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com