esakal | पन्‍हाळयाच्या चारी सीमा बंद; 10 दिवस कडक लॉकडाऊन

बोलून बातमी शोधा

पन्‍हाळ्याच्या चारी सीमा बंद; 10 दिवस कडक लॉकडाऊन
पन्‍हाळ्याच्या चारी सीमा बंद; 10 दिवस कडक लॉकडाऊन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पन्‍हाळा (कोल्हापूर) : पन्‍हाळा शहरात कोरोना रुग्‍णांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सोमवार पासून सलग 10 दिवस पन्‍हाळा शहरात पूर्ण लॉकडाऊन (टाळेबंदी) करण्‍याचा आदेश तहसिलदार तथा तालुका आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणचे अध्‍यक्ष रमेश शेंडगे यांनी दिला आहे.

पन्‍हाळा शहरात दररोज कोरोना बाधितांची संख्‍या वाढत असून, 5 एप्रिल पासून आज अखेर रुग्‍णांची संख्‍या 50 झाली आहे. त्‍यापैकी 18 जण पूर्णपणे बरे झाले असून, 22 जणांना गृह अलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर 9 जणांवर दवाखान्‍यात उपचार चालू आहेत. कोरेाना मुळे एकाचा म्रुत्‍यु झाला आहे. नगरपरिषदेनेही 28 एप्रिल रोजी कोरोना विषाणू संसर्ग रोखण्‍यासाठी 10 दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्‍याचा ठराव केला आहे. त्‍यामुळे तहसिलदारांनी नगरपरिषद हद्दीत 3 मे ते 12 मे असा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

हेही वाचा- डॉ.अतुल जोशी यांना आतंरराष्ट्रीय जॉन एल हार्पर पुरस्कार जाहीर

या कालावधीत नागरिकांना सार्वजनिक सण, उत्‍सव, यात्रा साजरे करता येणार नाहीत. शहराच्‍या चारी बाजूंच्‍या रस्‍त्‍याच्‍या सीमा बंद करण्‍यात येणार आहेत. शहरातील सर्व खाजगी संस्‍था,दुकाने, आस्‍थापना,व्‍यवसाय हे पूर्णपणे बंद राहणार असून, किराणा, भाजीपाला,फळे ही फक्‍त फोनवरून किवा ऑनलाईन पध्‍दतीने मागविता येणार आहेत. नागरिकांना दुकानात जाता येणार नाही. दुध विक्री सकाळी 7 ते 9 या वेळेतच होणार असून औषध दुकाने, दवाखाने व वैदयकीय सेवा तेवढ्या चालू राहणार आहेत. या सुचनांचा वापर न करणा-यांवर फौजदारी कारवाई करण्‍यात येणार आहे.

Edited By- Archana Banage