esakal | डॉ.अतुल जोशी यांना आतंरराष्ट्रीय जॉन एल हार्पर पुरस्कार जाहीर

बोलून बातमी शोधा

डॉ.अतुल जोशी यांना आतंरराष्ट्रीय जॉन एल हार्पर पुरस्कार जाहीर
डॉ.अतुल जोशी यांना आतंरराष्ट्रीय जॉन एल हार्पर पुरस्कार जाहीर
sakal_logo
By
युवराज पाटील -पुलाची शिरोली

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटी, लंडन यांच्यातर्फे पर्यावरण शास्त्रातील उत्कृष्ट संशोधनासाठी दर वर्षी दिला जाणारा जॉन एल हार्पर हा आतंरराष्ट्रीय पुरस्कार 2020 सालासाठी येथील संशोधक डॉ. अतुल अरविंद जोशी यांना जाहीर झाला आहे.

डॉ. जोशी हे सध्या बेंगलोर मधील ATREE या संस्थेमध्ये संशोधक म्हणून कार्यरत असून त्यांच्या संशोधनाची आतंरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने, शिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

पर्यावरण क्षेत्रातील अत्यंत मानाचा व प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा आतंरराष्ट्रीय पुरस्कार जर्नल ऑफ इकॉलॉजी या प्रतिष्ठित नियतकालिकातील उत्कृष्ट शोध निबंधासाठी दिला जातो. डॉ. अतुल जोशी यांनी दक्षिण भारतातील निलगिरी पर्वत रांगातील उंचावरील सदाहरित जंगलांचे पुंजके व त्याभोवती असणारे गवताळ प्रदेश यांच्या वितरणावर हिवाळ्यातील तापमान आणि हिमकण यामुळे होणारा परिणाम याविषयी शोधनिबंध सादर केला होता. तसेच जागतिक तापमान वाढीचे या परिसंस्थेवर कसा परिणाम होईल हे त्यांनी या संशोधनातून दाखवून दिले.

बेंगलोर येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल स्टडीज या संस्थेतून डॉ .महेश शंकरन व डॉ. जयश्री रत्नम या शास्त्रज्ञ यांच्या सोबत डॉ. जोशी यांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनाबरोबरच त्याना केंब्रिज विद्यापीठाद्वारा निलगिरी पर्वतरांगामध्ये परदेशी वनस्पतींचा ब्रिटिश कालखंडात कशा पद्धतीने शिरकाव झाला आणि त्याचे स्थानिक वन संपदेवर कसे परिणाम झाले याचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.

हेही वाचा- अभिमानास्पद! पोलिस महासंचालकांचे सन्मान पदक २६ जणांना; तीन अधिकाऱ्यांसह २३ कर्मचाऱ्यांचा समावेश

यामध्ये त्यांनी लंडन येथील ब्रिटीश लायब्ररीतील ऐतिहासिक दस्त ऐवजाचा अभ्यास करून ब्रिटीश काळामध्ये या परिसंस्थेविषयीच्या शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, त्यातून वन विभागाचे झालेले गैरसमज आणि त्यामुळे झालेला गवताळ प्रदेशांचा आणि त्यातील जैवविविधतेचा विध्वंस याविषयीचा अभ्यास केला. याविषयीचा शोधनिबंध Biological Conservation या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला.डॉ. अतुल जोशी यांच्याबरोबरच स्पेनच्या डॉ. ब्लँका कॉरिया यांनाही त्यांच्या न्यझीलंड मधील परिसंस्थेच्या संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Edited By- Archana Banage