Gadhinglaj: अल्पवयीनवर अत्याचार; एकाला सश्रम कारावास, आरोपी चंदगडचा, १० वर्षांची शिक्षा

पोलिसांनी तपास करून तिचा शोध घेतला. त्यानंतर तिची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संदीपने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून संदीप विरुद्ध पोक्सोंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Court Orders
Court Orderssakal
Updated on

गडहिंग्लज : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात दोषी ठरल्याबद्दल संदीप विष्णू हाजगोळकर (रा. ब्राम्हण गल्ली, चंदगड) याला १० वर्षांचा सश्रम कारावास, २० हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी हा निकाल दिला. सरकारतर्फे अॅड. एस. ए. तेली व अॅड. डी. एल. मोरे यांनी काम पाहिले. दरम्यान, २० हजार रुपये दंडातील १० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com