Kolhapur : जिल्ह्यातील १४५ गावांत १०० टक्‍के लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

जिल्ह्यातील १४५ गावांत १०० टक्‍के लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर : एकाबाजूला उर्वरित लसीकरणासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसताना जिल्‍ह्यातील १४५ गावांनी शंभर टक्‍के लसीकरण करून आदर्श निर्माण केला आहे. शंभर टक्‍के लसीकरणात सर्वाधिक गावे ही पन्‍हाळा तालुक्यातील आहेत. येथील २६ गावांनी शंभर टक्‍के लसीकरण पूर्ण केले आहे, तर भुदरगड तालुक्यातील सर्वात कमी म्‍हणजे एकाच गावात शंभर टक्‍के लसीकरण झाले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आरोग्य विभाग व जिल्‍हा प्रशासनाने १०० टक्‍के लसीकरण करण्याचे उद्दिष्‍ट ठेवले आहे. २० नोव्‍हेंबरपर्यंत १०० टक्‍के लसीकरण केले जाणार आहे. मात्र, सध्या संथ गतीने लसीकरण सुरू आहे. प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्‍न करूनही उर्वरित लोक लस घेण्यास तयार नाहीत. जिल्‍ह्यात एकूण ३० लाख लोकांना लस दिली जाणार आहे. यातील जवळपास २५ लाखांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. अजूनही ४ लाख ६० हजार लोकांचे लसीकरण होणे बाकी आहे. मात्र, गाव पातळीवर लसीकरणास फारसा प्रतिसाद नसल्याचे चित्र आहे.

गावोगावी, घरोघरी आशा वर्कर्सकडून लसीकरणाबाबत आवाहन केले जात आहे. जिल्‍हा प्रशासनही लसीकरणात वाढ करण्यासाठी विविध उपक्रम घेत आहे. या उपक्रमांना व आवाहनाला जिल्‍ह्यातील १०२५ गावांपैकी १४५ गावांनी फारच सुंदर प्रतिसाद दिला आहे.

शंभर टक्‍के लसीकरण पूर्ण झाले आहे त्या गावांचा आदर्श इतर गावांनीही घेऊन शंभर टक्‍के लसीकरण पूर्ण करावे.

-डॉ. फारूख देसाई,

जिल्हा लसीकरण अधिकारी

loading image
go to top