esakal | बेळगावात सोमवारी दहावीची परीक्षा; ओएमआर शिटचा होणार वापर
sakal

बोलून बातमी शोधा

10th exam

बेळगावात सोमवारी दहावीची परीक्षा; ओएमआर शिटचा होणार वापर

sakal_logo
By
महेश काशीद

बेळगाव : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी दहावीचा पहिला पेपर पार पडणार असून परीक्षेवेळी पेपर लिहून झाला तरी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेत पूर्ण वेळ वर्गात बसून राहावे लागणार आहे. तशी सूचना सर्व परीक्षा केंद्र प्रमुखांना करण्यात आली असून एकदा वर्गात प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेस ये-जा करण्यास मनाई असणार आहे. (10th-exam-update-karnataka-use-omr-sheet-belgaum-news-akb84)

कोरोनाच्या संकटामुळे दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. पहिल्यांदाच दहावीची परीक्षा स्पर्धात्मक परीक्षां प्रमाणे ओएमआर शिटचा वापर करून घेतली जाणार आहे. यावेळी 6 पेपर घेतले जाणार आहेत. त्यामुळे नव्या स्वरूपातील परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. शिक्षण खात्याने कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता परिक्षेला सामोरे जाण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले आहे.

पहिल्या दिवशी गणित, समाज विज्ञान व विज्ञान विषयाचा पेपर पार पडणार आहे. तर गुरुवारी मराठी, कन्नड व इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे. प्रत्येक पेपरला स्वतंत्र ओएमआर शीट व प्रश्नपत्रिका असणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तर लिहिण्याऐवजी ओएमआर शीटवर देण्यात आलेल्या पर्यायी उत्तर समोर ब्लॉक भरावा लागणार आहे. शिक्षण खात्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भात सर्व प्रकारची काळजी घेण्याच्या सूचना परीक्षा केंद्रप्रमुख व शिक्षकांना केल्या आहेत.

दहावीच्या परिक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी ओएमआर शिट किंवा प्रश्न पत्रिकेबाबत गोंधळ न करून घेता पेपर जावा तसेच यावेळी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत.

अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

यावर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्या बेळगाव शिक्षण जिल्ह्यात मोठा करून असून शैक्षणिक जिल्ह्यातील 35308 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपला शिक्षण खात्याकडून मास्क वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून परीक्षेपूर्वी सर्व वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. बेळगाव शिक्षण जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर सहाशे लिटर सॅनिटायजर्सचे वितरण करण्यात आले आहे.

loading image