शहरातील महाविद्यालये, वर्दळीची ठिकाणे, बस थांबे, रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी महिला, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथके कार्यरत आहेत.
-गौरव डोंगरे
कोल्हापूर : महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी (Kolhapur Crime) देश हादरून गेला आहे. कोलकता येथील डॉक्टर तरुणी, बदलापुरातील शाळेत बालिकांचे झालेले लैंगिक शोषण, कोल्हापुरातील शियेमधील १० वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार व खुनाच्या प्रकाराने समाजाचे निष्ठूर रूप समोर आणले. जिल्ह्यात सात महिन्यांमध्ये बलात्काराच्या ११३, तर विनयभंगाच्या २०५ घटना घडल्या आहेत.