
Kolhapur Weather Forecast : पावसाची जिल्ह्यात संततधार सुरूच राहिली. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिला. राधानगरी, दुधगंगा, वारणा, तुळशी, पाटगाव, घटप्रभा या सहा धरणांतून १२ हजार ३७६ क्युसेक विसर्ग सुरू राहिला. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सकाळपासून रात्रीपर्यंत ११ इंचाने वाढ झाली. ती रात्री ३२ फूट दोन इंचावर होती. अद्याप ५० बंधारे पाण्याखाली असून, २१ मार्ग बंद आहेत.