२००८ व २०१८ या मध्ये सर्वाधिक १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून तुटपुंजी मदत मिळाली आहे. अवघ्या एक लाख रुपयांच्या मदतीमध्ये काय होणार? याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे.
-प्रवीण देसाई
कोल्हापूर : डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. आता ते फेडायच कसं? ही विवंचना रात्री झोपू देईना. दिवसरात्र याच विचारांनी डोक्यात काहूर माजायचे. शेवटी यातनं एकदा मोकळ होऊया म्हणत मृत्यूला कवटाळयचं. हे विदारक चित्र आहे, जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच (Farmers). त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर ओढवलेली परिस्थिती न पाहवणारी आहे. त्यातच सरकारकडून (Government of Maharashtra) मिळणारी मदतही तोकडीच आहे. त्यामुळे पोराबाळांची अक्षरश: दैना झाली आहे. याचे वास्तव मांडणारी ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मरणकळा’ ही मालिका आजपासून...