
प्रवीण देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेसोळा हजार सातबारा उताऱ्यांवर मृत खातेदारांची नावे कायम आहेत. त्यामुळे वारसांना अनेक अडचणी येत आहेत.
त्या दूर करण्यासाठी 'जिवंत सातबारा' मोहिमेंतर्गत तलाठ्यांद्वारे गावनिहाय सर्व्हे सुरू आहे. फेरफार प्रक्रिया होऊन सात-बारा उताऱ्यांवर मृत खातेदारांच्या जागी वारसांची नावे लावण्याचे काम सुरू आहे. या महिनाअखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जवळपास तीन हजार वारसांची नावे सातबाऱ्यावर लागली आहेत.