
दीपक कुपन्नावर
गडहिंग्लज : येथील आगाराला रोज लखपती बनवणारा मार्ग म्हणजे संकेश्र्वर होय. सतत प्रवाशांची गर्दी असणाऱ्या १४ किमीच्या अंतरावर तब्बल १८ बसथांबे आहेत. त्यातच वर्षभरापासून हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने बसचा वेग कमालीचा वाढला आहे. परिणामी, कमी अंतर, वेळ आणि अधिक बस थांब्यामुळे प्रवाशांचे बुकिंग करण्यासाठी रोजच वाहकाची त्रेढातिरपीट उडते.