मशागत, बी-बियाणे, औषधे, मजुरी यासाठी त्यांनी तब्बल एकरी चाळीस हजार रुपयांप्रमाणे चार एकरांसाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च केले आहेत.
जयसिंगपूर : अतिपावसामुळे अजूनही जमिनीत ओलावा राहिल्याने शाळू पिकाची वाढ खुंटली आहे. पीक लालसर पडून करपू लागल्याने येथील प्रकाश मादनाईक या शेतकऱ्याने (Farmers) चार एकर शाळू पिकावर रोटर फिरवला. दर मिळत नसल्याने भाजीपाला (Vegetables) पिकावर रोटर फिरवल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असताना आता शाळू पिकावरदेखील रोटर ठरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.