esakal | कोल्हापुरात दिवसभरात 852 नवे रुग्ण; 1 हजार 94 कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात दिवसभरात 852 नवे रुग्ण; 1 हजार 94 कोरोनामुक्त

कोल्हापुरात दिवसभरात 852 नवे रुग्ण; 1 हजार 94 कोरोनामुक्त

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना (covid -19 patients) चाचण्याची संख्या वाढवल्यापासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ अजूनही कायम आहे. त्यानुसार आज दिवसभरात जिल्ह्यात ८५२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. २० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १ हजार ०९४ व्यक्ती कोरोना मुक्त झाले आहेत.

गेल्या महिन्याभरापासून शहरातील (kolhapur city) गर्दीत वाढत होत आहे. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले या तालुक्यात सरासरी रोज २०० च्या आसपास नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अन्य तालुक्यात ज्यांना लक्षणे आहेत, त्यांच्या कोरोना चाचणी (corona test) करण्यात येत असल्याने ७ तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत आहे. परंतु एकूण संख्या रोजच वाढती असल्याने उपचाराखाली असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत कोरोना आटोक्यात आणणे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा: पुढचे 4 दिवस कोल्हापुरला हाय अलर्ट; डोंगरी भागात सतर्कतेचा इशारा

 • दिवसभरातील एकूण कोरोनाबाधित ः ८५२

 • दिवसभरातील एकूण कोरोना मुक्त ः १०९४

 • दिवसभरातील एकूण मृत्यू ः २०

 • आजवरचे एकूण बाधित ः १ लाख ८८ हजार ९२२

 • आजवरचे एकूण कोरोना मुक्त ः १ लाख ७० हजार ४७९

 • आजवरचे एकूण मृत्यू ः ५ हजार २६४

 • आजचे एकूण उपचारार्थी ः १३ हजार १७९

 • शहरातील आजचे बाधित ः १९०

 • एकूण आजच्या चाचण्या ः१३७२३९

 • दिर्घकालीन आजार ः ५

 • ६० वर्षार्वरील मृत्यू ः १३

 • रूग्णालयात दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आतील मृत्यू ः ३

loading image