गोखले कॉलेज परिसरातील गोखले कॉलेज चौक (Gokhale College Chowk) शिवजयंती उत्सव समितीतर्फे यंदा कायमस्वरूपी २१ फुटी फायबरची मूर्ती तयार केली आहे.
कोल्हापूर : ‘घडू दे नवी ही कथा आता राजा, घडू दे नवा इतिहास...ताठ होतील माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...,’ असे अभिमान गीत गात आज (ता. १९) सर्वत्र शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी होत आहे. दरम्यान, शहर शिवमय झाले असून, शिवज्योती नेण्यासाठी सकाळपासूनच पन्हाळगडावर (Panhalgad) गर्दी झाली आहे.