

Young Soldier Dies At 27 After Sudden Fever And Coma Tragedy Comes Just Six Weeks After His Marriage In Maharashtra
sakal
सिद्धनेर्ली : वंदूर (ता. कागल) येथील भारतीय नौदलातील जवान जय अनिल नलवडे (वय २७) यांचे आजारपणामुळे शनिवारी (ता. १२) पहाटे निधन झाले. दीड महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या जय यांच्या निधनाने नलवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी वंदूर येथे आणताच कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.