कोल्हापूर : नॅनो जैवतंत्रज्ञान व कॅन्सरवरील संशोधनासाठी ४ कोटी २७ लाख निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shivaji university

कोल्हापूर : नॅनो जैवतंत्रज्ञान व कॅन्सरवरील संशोधनासाठी ४ कोटी २७ लाख निधी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात नॅनो जैवतंत्रज्ञान व कॅन्सरवरील संशोधनास लागणाऱ्या सुविधांसाठी भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या बिल्डर योजनेअंतर्गत ४ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून नॅनो जैवतंत्रज्ञान व कन्सरवरील संशोधनास लागणारी आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा विद्यापीठात उभारण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत एकूण निधीपैकी विद्यापीठास २ कोटी ८५ लाख रुपये मिळाले आहेत. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील पाच वर्षीय प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत डॉ. के. डी. सोनवणे, डॉ. के. डी. पवार, डॉ. "एम.एस. निंबाळकर प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक म्हणून काम पाहतील. प्रकल्प अंतर्गत विविध धातूचे, विविध आकाराचे नॅनोपार्टीकल्स तयार करणे व त्याचे भौतिक गुणधर्म तपासणे याविषयी संशोधन केले जाईल. तसेच जीवाणू, विषाणू, वनस्पती कवक यांच्यामधील नॅनो तंत्रज्ञान व उपयुक्ततेबाबत संशोधन केले जाईल.

पश्चिम घाटातील विविध वनस्पतींचा नॅनो पार्टीकल्स तयार करण्यासाठी आणि त्याच्या औषधी व शेतीपूरक वापराबाबतही संशोधन करतील. त्याचप्रमाणे बायोइन्फॉर्मेटिक्स तंत्रज्ञानाच्या साह्याने नॅनोकण व नॅनो मटेरिअल यांचे सिथेसिस करून नॅनोपार्टीकल्सचा सजीव पेशींत होणाऱ्या परिणामाविषयी चाचण्या केल्या जातील.

संशोधनाचे महत्त्व...

संशोधनामुळे विविध सजीवांचा उपयुक्त नॅनोकण निर्मिती करण्यासाठीच्या उपयोजनाबाबत भरीव माहिती मिळेल. नॅनोकण बनविणाऱ्या जीवाणूंचा शोध, नॅनोकण व नॅनोमटेरिअलचा कर्करोग, न्यूरोसायन्स अल्झायमर (स्मृतिभ्रंश), टारगेटेड ड्रग डिलीव्हरी व रिलीज, कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त नॅनोमटेरिअल, नॅनो पेस्टीसाईड अनुषंगानेही संशोधन केंद्रित असेल. नॅनो तंत्रज्ञानाला पूरक स्वरूपाचे अध्ययन अध्यापन व त्यासंदर्भातील संशोधनासाठी लागणारे प्रशिक्षण कार्यशाळा, वेबिनार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन यांचाही या प्रकल्पात अंतर्भाव आहे कुलगुरू प्रा. डाॅ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरु प्रा. डाॅ. पी. एस. पाटील यांचे प्रकल्पासाठी मार्गदर्शन मिळत आहे.

Web Title: 4 Crore 27 Lakh Funds For Research On Nano Biotechnology And Cancer Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top