esakal | जिल्हा पोलिस दलात दाखल झालेल्या या वाहनांच्या ताफ्यामुळे पोलिस दलात ऊर्जा निर्माण झाली आहे.

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात गस्तीसाठी 51 वाहनांचा ताफा दाखल
कोल्हापुरात गस्तीसाठी 51 वाहनांचा ताफा दाखल
sakal_logo
By
स्नेहल कदम

कोल्हापूर : गस्तीसाठी चारचाकी व मोटारसायकल अशा 51 वाहनांचा ताफा जिल्हा पोलिस दलात दाखल झाला. पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ही वाहने पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पोलिस ग्राऊंडवर हा आज कार्यक्रम झाला.

पोलिस मैदानावर संबधित वाहनांचे पूजन पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी देसाई यांच्या हस्ते झाले. त्यांनी संबधित वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. जिल्हा पोलिस दलात दाखल झालेल्या या वाहनांच्या ताफ्यामुळे पोलिस दलात ऊर्जा निर्माण झाली आहे. याचा गुन्हेगारी कमी करण्यास व पिडीतांना वेळीत मदत पोहचविण्याचे काम वेळेत केले जाणार आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, जयश्री गायकवाड, शहर पोलिस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आदीसह सर्व पोलिस ठाण्यातील सर्व प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्याबरोबर पिडीत व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ऑनलाईन गस्त प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. याचे सेंटर मुंबई व नागपूर येथे आहे. जिल्ह्यात ज्या भागात गस्त आवश्‍यक आहे अशा ठिकाणी 'क्‍यूआर कोड' प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गस्त घालण्यासाठी 16 चारचाकी व 35 मोटारसायकल आज जिल्हा पोलिस दलात दाखल झाल्या. शहरासह इचलकरंजी येथे पोलिस ठाण्या अंतर्गत बीट मार्शलची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत 250 ठिाणी संबधित वाहनांतून गस्त घालण्यात येईल. येथील क्‍यूआरकोडवर स्कॅनकरून त्याच्या नोंदी पोलिस मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. त्यांनी 100 अगर 112 या क्रमांकावर संपर्क साधल्यास येथे गस्तीचे पथक तात्काळ दाखल होईल असे पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले.

पर्यटकांनाही मदतीचा हात

पोलिस ठाणे अंतर्गत गस्तीसाठी पुरविण्यात येणारी वाहने शहरातील मुख्य मार्ग चौकात राहणार आहेत. यातील कर्मचाऱ्यांकडून शहरात येणाऱ्या पर्यटकांना येणाऱ्या अडचणी इतर मार्गदर्शनाचेही काम केले जाईल असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.