
उजळाईवाडी: कोरोनामुळे खंडित झालेली विमानसेवा 25 मे 2020 पासून पूर्ववत सुरू झाल्यावर 60 हजार 905 प्रवाशांनी कोल्हापूर विमानसेवेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. देशांतर्गत विमान सेवेत तुलनात्मकदृष्ट्या कोल्हापूर विमानतळावरील प्रवाशांचा प्रतिसाद हा सर्वाधिक असल्याचे दिसून येते.
कोल्हापूर विमानतळावरून हैदराबादसाठी इंडिगो एअरलाइन्स व अलाइंस एअरची रोज दोन फ्लाईट, बंगळूरसाठी अलायन्स एअर कंपनीची एक व मुंबईसाठी ट्रू जेट कंपनीची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरू आहे. या विमान सेवांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, 268 दिवसांमध्ये एक हजार 628 विमानांचे संचलन झाले आहे. यात 60 हजार 905 प्रवाशांनी या विमान सेवेचा लाभ घेतला.
कोल्हापूर विमानतळावर देशांतर्गत विमान प्रवासी वाहतुकीत कमी विमाने असूनही सरासरी प्रवाशांचा प्रतिसाद मात्र सर्वोत्तम आहे. कोल्हापूर विमानसेवा ही विमान कंपन्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. यामुळेच भविष्यात कोल्हापूरमधून विविध मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच इंडिगो एअरलाइन्स कंपनीने 22 फेब्रुवारीपासून अहमदाबाद या नवीन मार्गावरील विमानसेवा सुरू केली. मध्यंतरीच्या काळात खंडित झालेली तिरुपती विमानसेवाही सुरू केली आहे. त्याचबरोबर दिल्ली मार्गावरील विमानसेवाही लवकर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
22 फेब्रुवारीपासून कोल्हापूर विमानतळावरून रोज 12 विमानांचे संचलन होणार असून, यामुळे कोल्हापूर विमानतळावरील लगबग लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.