कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह सोलापूर आणि पुणे ग्रामीण या भागांचा समावेश होतो.
कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातून सहा महिन्यांत १२३० मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्या पैकी ६४१ अद्याप सापडलेल्या नाहीत. या कालावधीत नऊ महिलांचे खून झाले असून, खुनाच्या प्रयत्नांचे चार प्रकार घडले आहेत. लैंगिक अत्याचार (Molestation of Girls and Women) करून खून झाल्याचा एक प्रकार आहे. महिलांवरील अत्याचाराची मालिका सुरूच असून, बेपत्ता महिलांचा ठावठिकाणा कधी लागणार, याच्या प्रतीक्षेत त्यांचे कुटुंबीय आहे.