
Shivaji University kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात केवळ शिवाजी विद्यापीठात ६५ हून अधिक स्टार्टअपची नोंदणी असून, ४० हून अधिक नोंदणी प्रक्रियेत आहेत. आजपर्यंत आठ प्रकल्पांना दोन कोटी ३५ लाखांहून अधिक बीज भांडवल आणि अर्थसाहाय्य झाले आहे. नावीन्यपूर्ण कल्पना सूचवा, त्यासाठी केंद्र शासनाकडून मदत, अनुदान, कर्ज घ्या आणि तुमचा व्यवसाय सुरू करा. ‘नोकरी मागू नका, नोकरी द्या’ असा संदेश स्टार्टअप योजनेने दिला आहे.