सांगली : बिगर कर्जदारांना मताधिकार

‘सहकार’च्या नियमांत मोठा बदल; सत्ता मिळवण्यासाठीची गणिते बदलणार
societys elections
societys electionssakal

सांगली : राज्याच्या सहकार विभागाने यंदाच्या विकास सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी बिगर सभासदांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत मोठा बदल केला आहे. बिगर कर्जदारांना यापूर्वी केवळ एक मताचा अधिकार होता. सुधारित नियमानुसार आता त्यांना प्रथमच सर्व संचालकांसाठी मतदानाचा हक्क मिळाला आहे. जिल्ह्यातील ७६५ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहेत. त्यातील १११ सोसायट्यांच्या निवडणुका १७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान तीन टप्प्यात होणार आहेत. सत्ता मिळवण्याची गणिते यंदा बदतील, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत आहे.

विकास सोसायट्यांच्या निवडणुकीत पहिल्यापासूनच कर्जदार व बिगरकर्जदार सभासद अशी वेगळी नोंदणी असते. त्यांना मताचे अधिकारही असतात. कर्जदार सभासदांना बिगरकर्जदार एक प्रतिनिधी वगळता, अन्य सर्व संचालकांसाठी मतदान करू शकत होते. बिगर कर्जदार सभासदांना केवळ एकच संचालक निवडून देण्याचा अधिकार होता. यंदाच्या निवडणुकीत सहकार कायद्यात काहीसा बदल करण्यात आला आहे. बिगरकर्जदार सभासद नव्या नियमानुसार ज्या त्या सोसायटीच्या उलाढालीवर ७, ९, ११ ते १३ संचालकांना मतदान करू शकणार आहेत. त्यात खुला गट, राखीव, महिला प्रतिनिधींचा समावेश आहे.

गटा-तटांमध्ये लढती रंगणार

जिल्ह्यातील १११ विकास सोसायट्यांसाठी येत्या आठवड्यात मतदान होत आहे. स्थानिक पातळ्यांवरील पक्षविरहित गटा-तटांमध्ये लढतीचे स्वरूप आहे. बहुतांश सोसायट्यांत अपवाद वगळता दुरंगी लढतीचे चित्र असून, पॅनेल प्रमुखांसह उमेदवारांनी सभासदाच्या भेटीगाठींवरच भर दिला आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका जवळपास दीड वर्षे लांबल्या होत्या. सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाल्यामुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांच घेतल्या जात आहेत.

थकबाकीदार राहणार वंचित

विकास सेवा सोसायट्यांच्या मतदानापासून थकबाकीदार सभासद मात्र वंचित राहणार आहेत. ही संख्या प्रत्येक सोसायटीनुसार वेगवेगळी असणार आहे. मात्र त्यापेक्षा खातेदार सभासद मृत झाल्यानंतर वारसा नोंद न केलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांचे प्रमाण ६ ते ८ टक्के दरम्यान आहे.

सहकार विभागाने यंदा विकास सेवा सोसायट्यांसाठी सर्वच सभासदांना सर्व संचालकांसाठी मतदानाचा अधिकार दिला आहे. सक्रिय व बिगरकर्जदार असा फरक ठेवलेला नाही. यापुढे सर्वच निवडणुकीत अशी परस्थिती राहील.

- नीळकंठ करे, सहकार उपनिबंधक, सांगली

दृष्टिक्षेप

७६५ - जिल्ह्यातील विकास सोसायट्या

४.१५ - लाख सभासद संख्या

३.०५ - लाख कर्जदार सभासद सुमारे

१.१० - लाख बिगर कर्जदार सभासद

२५० ते २००० - सोसायट्यांची सभासद संख्या

  • सर्व सोसायट्या- जिल्हा मध्यवर्ती बॅंकेशी संलग्न

  • अनेक सोसायट्यांत कर्ज वितरण हाच मुख्य व्यवसाय

  • २५ टक्के सोसायट्यांनी सुरू केले अन्य व्यवसाय

  • पेट्रोल पंप, खत, दळप, औषध दुकान आदींमध्ये प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com