esakal | कनाननगर झोपडपट्टीत अँटिजनमध्ये 8 पॉझिटिव्ह; महापालिकेची धडक मोहीम

बोलून बातमी शोधा

कनाननगर झोपडपट्टीत अँटिजनमध्ये 8 पॉझिटिव्ह; महापालिकेची धडक मोहीम
कनाननगर झोपडपट्टीत अँटिजनमध्ये 8 पॉझिटिव्ह; महापालिकेची धडक मोहीम
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कनाननगर झोपडपट्टीत महापालिकेच्या वतीने मोबाईल व्हॅनद्वारे विनाकारण फिरणाऱ्या 44 नागरिकांची रॅपिड अँटिजन चाचणी घेतली. यात चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह 40 जण निगेटिव्ह आले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी अचानक भेट देऊन मोहिमेची पाहणी केली. संचारबंदी असतानाही अत्यावश्‍यक कामाच्या नावाखाली नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ऍटिजेन चाचणी करण्यात येत आहे.

हेही वाचा- वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडले प्राण; अंकलीवर शोककळा

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, माजी नगरसेवक दिलीप पोवार उपस्थित होते. दरम्यान, सकाळी क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे मोबाईल व्हॅनद्वारे अँटिजेन टेस्ट घेतली. खरेदीसाठी आलेल्या व विनाकारण फिरणाऱ्या व भाजी विक्रेत्यांसह 144 नागरिकांची टेस्ट केली. यात 140 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये 2 भाजी विक्रेते असून 2 स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.

Edited By- Archana Banage