esakal | वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडले प्राण; अंकलीवर शोककळा

बोलून बातमी शोधा

वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडले प्राण; अंकलीवर शोककळा
वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलानेही सोडले प्राण; अंकलीवर शोककळा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर (कोल्हापूर) : येथील अंकली वेसमध्ये बुधवारी (ता. २१) काही तासाच्या अंतराने वडिलांच्या पाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाला. दीपक शंकर सुतार (वय 50) व आकाश दीपक सुतार (वय 19) अशी मयतांची नावे आहेत. वडिलांच्या जाण्याने आपल्यावरील उपचार कसे होणार, या भीतीपोटी बसलेल्या धक्क्यामुळे मुलाचाही मृत्यू झाला. घडलेल्या या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,

संकेश्वर शहरात दीपक शंकर सुतार हे सुतार काम करत. बुधवारी (ता. २१) सकाळी छातीत दुखु लागल्याने रुग्णालयाला घेऊन जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा आकाश याला ह्रदयाचा आजार होता. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या मनावर जोराचा आघात होऊन मोठा धक्का बसला. यामुळे त्याचेही निधन झाले.

अतिशय गरीब परिस्थितीतून आकाशवर चार-पाच वर्षांपासून उपचार सुरु होते. पण शेवटी उपचार करणारे वडील गेल्याचा धक्का सहन न झाल्याने मुलानेही आपले प्राण सोडले. दीपक सुतार यांच्या मागे पत्नी मुलगा व अविवाहित बहीण असा परिवार आहे. घरातील दोन व्यक्ती एकाच दिवशी गेल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे त्यांचे सांत्वन करायचे कसे, असा प्रश्न नातेवाईक व उपस्थितांना पडला होता.या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सात महिन्यात दुसरी घटना

बाप-लेकाचा एकाचवेळी मृत्यू होण्याची सात महिन्यातील संकेश्वर येथील ही दुसरी घटना आहे. काळेकर कुटुंबातील पुंडलिक गंगाराम काळेकर व राजेंद्र पुंडलिक काळेकर हे एका पाठोपाठ मयत झाले होते. त्याची चर्चा आज दिवसभर शहरात सुरू होती

Edited By- Archana Banage