आनंदाच्या भरात झेलण्यसाठी वर फेकलेलं बाळ आदळलं थेट फरशीवर आणि...

8 year boy dead after thrown up to catch in kolhapur
8 year boy dead after thrown up to catch in kolhapur
Updated on

कोल्हापूर : कोरोनासारख्या महाभयानक रोगाने सध्या जगभरात थैयमान घातले आहे. त्यापार्श्वभूमिवर कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोना संशयितांना किंवा स्थलांतरीतांना क्वारंटाईन केले जात आहे. परंतु, अशा स्थलांतरीतांच्या बालकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुढे आले आहे. यातूनच कोल्हापुरात एका बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. आंनंदाच्या भरात झेलण्यासाठी वर फेकलेले बाळ फरशीवर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 8 मे रोजी ही घटना घडली असून आता ती उघडकीस आली आहे. बाळाच्या अशा मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

याबाबत अधिक माहित अशी, येथील बालकल्याण संकुलात हा प्रकार घडला आहे. ही घटना घडल्यानंतर ज्याच्या हातून बाळाचा मृत्यू झाला तो खूप अस्वस्थ होता. मात्र, चौकशी दरम्यान, पोलिसांनी त्याला विश्वासात घेत समज दिली. त्यानंतर त्याने सर्व खरी हकीकत सांगितली. तोही अल्पवयीनच असून त्याच्या जबाबानंतर मृत्यूस जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. 

कोरोची (ता. हातकणंगले)येथील स्वयंसेवी संस्थेवर कारवाई केल्यानंतर काही बालक बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरू होता. 12 मार्चला ते संस्थेत दाखल झाले होते. त्याची बहिण याच संस्थेत होती. दरम्यान, सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, ज्याच्या हातातून बाळ पडले आहे तोदेखील निराधार आहे. पण त्याला बाळाचा लळा लागला होता. त्यामुळे त्याला खेळवताना चुकून हा प्रकार घडला.

बाळाला हवेत उडवणे, हातावर उभा करणे, बोटावर उभा करणे अशी अनेकांना हौस असते. परंतु, अशे प्रकार बाळांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे काळजी घेण गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com