esakal | काम समान, वेतन मात्र असमान ; २४ तास राबूनही दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

84 doctors in the National Child Health Program do not get proper pay

बाल स्वास्थ्य मिशन कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि औषधनिर्माता यांची सुमारे चाळीस टक्के पदे रिक्त आहेत.

काम समान, वेतन मात्र असमान ; २४ तास राबूनही दुर्लक्ष

sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर - अंगणवाडीतील बालकांची आणि शाळेतील मुलांची सातत्याने आरोग्य तपासणी व मोफत उपचार करणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधील 84 डॉक्‍टरांसह नर्सेस व औषधनिर्मातांची कोरोनाच्या काळात मदत झाली आहे. मात्र, एमबीबीएस डॉक्‍टरांच्या बरोबरीने समान काम करूनही त्यांच्या प्रमाणे वेतन मिळत नसल्याने ही तफावत शासनाने दूर करावी, अशी मागणी या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केली आहे. 
राज्यात अंगणवाडी व शाळांमधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी करणे, मोफत आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने "आरबीएसके' हा कार्यक्रम तयार केलेला आहे. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये 2013 पासून हा कार्यक्रम राबविण्यात येतो. एका पथकामध्ये आयुषचे पुरूष व महिला वैद्यकीय अधिकारी, एक नर्स आणि औषधनिर्माता असतात. ही पथके ग्रामीण भाग व शहरी भागात कोविड सेंटरमध्ये कार्यरत आहेत. 

कोरोना काळात राज्य शासनाने नियमित तसेच कंत्राटी एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. परंतु अद्यापही बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित सेवेत घेतलेले नाही. तसेच कोरोनाच्या संकटाच्या काळातही वेतनात वाढ केलेली नाही. सातत्याने बारा ते पाच वर्षे काम करूनही वेतनात वाढ न झाल्याने त्यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण झाले आहे. त्यामुळे कोविड कक्षात जोखिम पत्करून काम करणाऱ्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी सध्या होत आहे. 

जिल्ह्यातील काही कोविड सेंटरमध्ये थेट राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत नियुक्त मानधनावरील डॉक्‍टरांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे चित्र आहे. यामध्ये जिल्ह्यात एकून 84 डॉक्‍टर कार्यरत आहेत. यातील सर्वांनाच कोविड सेंटरमध्ये नियुक्ती दिली आहे. यात 42 महिला डॉक्‍टरांचाही समावेश आहे. 

मानधनावरील डॉक्‍टरांना बजावावी लागतात ही कामे 
0 सर्व्हेक्षण करणे, ताप क्‍लिनिकमध्ये थेट रूग्णांची तपासणी करणे 
0 उपलब्ध साधनांवर पॉझिटीव्ह रूग्णांची तपासणी करणे 
0 संशयितांचे स्वॅब घेणे 
0 ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये चोविस तास कार्यरत 
0 आठ तास पीपीई कीट घालून रूग्णांवर उपचार 

हे पण वाचा -  आरटीओतील एजंटगिरीला लागणार चाप  

बाल स्वास्थ्य मिशन कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि औषधनिर्माता यांची सुमारे चाळीस टक्के पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या डॉक्‍टर, नर्सेस आणि औषधनिर्मात्यांना कमी वेतनावर काम करावे लागते. कोरोनाच्या संकटात 14 डॉक्‍टर बाधित झाले. बाल स्थास्थ्य मिशन कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व औषधनिर्मात्यांना नियमित करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. 
- डॉ. रमेश रेडेकर, माजी अध्यक्ष, आरबीएसके कॉन्ट्रक्‍चुअल वैद्यकीय अधिकाऱ्यांची संघटना 

हे पण वाचाGood News; Video - जगभरातील गिर्यारोहन कोल्हापूरकरांसाठी होणार खुले

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top