सीमाभागातील सर्वच जिल्ह्यांतील सरसकट रुग्णांना ही सेवा मिळणार नसून, महाराष्ट्राच्या सीमेवरील निश्चित केलेल्या ८६४ गावांतील रुग्णांना उपचार मिळणार आहेत.
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Phule Jan Arogya Yojana) कर्नाटक सीमाभागातील ८६४ गावांच्या रुग्णांसाठी कोल्हापुरात मोफत वैद्यकीय उपचार सेवा सुरू झाली आहे. आतापर्यंत जवळपास ८५ रुग्णांनी याचा लाभ घेतला. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ कर्नाटक सीमाभागातील रुग्णांना होत आहे.