कोल्हापूर जिल्ह्यात चिमुकले, तरूणांकडून कोरोनाला ठोसा

कोल्हापूर जिल्ह्यात चिमुकले, तरूणांकडून कोरोनाला ठोसा
Updated on

गडहिंग्लज : जिल्ह्यात कोरोनाचा कहर...एवढेच चित्र नजरेत दिसत असले तरी त्याची दुसरी बाजू मात्र नागरिकांना दिलासा देणारी आहे. 1 ते 10 व 21 ते 50 वयोगटातील बाधितापैकी सर्वाधिक 88 टक्के चिमुकले आणि तरूणांनी कोरोनाला हरवण्यात यश मिळविले आहे. त्या खालोखाल 11 ते 20 आणि 51 ते 70 वयोगटातील अनुक्रमे 77 व 57 टक्के रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने रूग्ण बरे करण्यात मिळवलेल्या यशाचे कौतूक होत आहे. 

जिल्ह्यात आज (ता. 5) सकाळी दहापर्यंत 941 रूग्णांची नोंद झाली आहे. 13 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हजाराकडे वाटचाल सुरू असलेल्या बाधित रूग्ण संख्येने जिल्हा हादरला आहे. ही एक बाजू असली तरी दुसरीकडे आरोग्य यंत्रणेने अहोरात्र कष्ट घेवून उपचार केल्याने सरासरी 79 टक्के रूग्ण आजअखेर बरे झाल्याचे चित्र आहे. आजअखेर 739 रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. या सकारात्मक बाजूने जिल्ह्याला दिलासा मिळाला असून यामध्ये सर्वाधिक तरूण आणि चिमुकल्यांनीच कोरोनावर मात केली आहे. 70 वर्षावरील 8 पैकी चौघांनी कोरोनाला हरवले आहे. 51 ते 70 वयोगटातील रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 57 टक्के आहे. 

जिल्ह्यात आढळलेल्या रूग्णापैकी सर्वाधिक रूग्ण मुंबईमधील असल्याचे समोर आले आहे. पंधरावड्यापूर्वी एकूण रूग्ण आणि बरे झालेल्या रूग्ण संख्येमध्ये मोठी तफावत नव्हती. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रूग्णांवर उपचार सुरू होते. परंतु, पुन्हा जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या वाढत राहिल्याने रोज रूग्णांचा आलेख चढता राहिला आहे. नव्याने रूग्ण नोंदीमुळे आजअखेर उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या 189 इतकी आहे. सीपीआरसह जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात अजूनही समूह संसर्ग नसल्याचे प्रशासनाचे मत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri Express
Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Marathi News Esakal
www.esakal.com