यळगुडातील 9 वर्षीय मुलगी गायब; 'वरद' प्रकरणानंतर घडली ही घटना

यळगुडातील 9 वर्षीय मुलगी गायब; 'वरद' प्रकरणानंतर घडली ही घटना

हुपरी (कोल्हापूर) : यळगुड (ता.हातकणंगले) येथील नऊ वर्षीय मुलगी मुलगी बेपत्ता झाली आहे. कागल तालुक्यातील सोनाळी येथे वरद पाटील या बालकाच्या अपहरण व खुनाच्या ताज्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून तीच्या शोधासाठी जंग जंग पछाडलं जात आहे. नातेवाईकां बरोबरच नागरिकांकडूनही शोध सुरू ठेवला आहे.

यळगुडातील 9 वर्षीय मुलगी गायब; 'वरद' प्रकरणानंतर घडली ही घटना
मुश्रीफ म्हणतात मोर्चे काढू नका, मग काय भजन करायचं का?; पाहा व्हिडिओ

काल रविवारी (ता. २२) सायंकाळी सातच्या सुमारास ही मुलगी गायब असल्याचे आई वडीलांच्या निदर्शनास आले. तिची शेजारी तसेच इतरत्र शोध घेतला पण ती आढळून आली नाही. दरम्यान, वडील युवराज आत्माराम साळुंखे यांनी हुपरी पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची वर्दी दिली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत. काल रविवारी रात्री पासूनच विशेष पथकांद्वारे शोध घेतला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com