
कोल्हापूर : नेकलेस बनविण्यासाठी दिलेले ९ तोळे चोख सोने घेऊन कारागीर पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंद्रशेखर सिंगा (रा. दुर्गापूर, पश्चिम बंगाल) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत सराफ व्यावसायिक कुमार टेकचंद जैन (वय ५८, रा. आझाद गल्ली) यांनी फिर्याद दाखल केली.