
कोल्हापूर : सवलतीच्या दरात युरोप टूर करून आणतो, असे सांगून पावणेपाच लाखांची फसवणूक करणाऱ्या कल्याण (जि. ठाणे) येथील एजंटाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. प्रशांत पुरुषोत्तम जावडेकर (वय ३८, ऐ-४ - १४०३ पुण्योदय पार्क, डॉन बॉस्को स्कूलजवळ, कल्याण पश्चिम, जि. ठाणे) असे त्याचे नाव आहे. याची फिर्याद शाल्मली सुनील जोशी (निंबाळकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी दिली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.