
Kolhapur Crime : शिक्षण केवळ सातवीपर्यंतचे....चालक म्हणून काम....ब्लेझरसोबत गळ्यात, हातात सोने...अलिशान मोटारीतून रूबाब...अल्पावधीत ‘गोल्डन मॅन’ अशी ओळखही मिळवली; परंतु गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या या एजंटाचा रुबाब अखेर पोलिसांनी उतरवला. ‘ए. एस’ ट्रेडर्सचा मुख्य एजंट म्हणून कोट्यवधींची माया मिळविणाऱ्या संदीप लक्ष्मण वाईंगडे ऊर्फ गोल्डन मॅन (वय ३९, रा. पाटील गल्ली, उचगाव) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील १० लाखांची मोटार जप्त केली, तर १३ तोळे सोने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.