एक फेब्रुवारीपासून संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांचे अनुदान डी. बी. टी. मार्फत त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
जयसिंगपूर : संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्त्यांची पेन्शन (Pension) एक फेब्रुवारीपासून महा डी. बी. टी. प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, यासाठी शिरोळ तालुक्यातील ७१०८ लाभार्थ्यांचे डी. बी. टी. पोर्टलवर आधारकार्ड व्हेरिफाय करण्याचे कामकाज प्रलंबित असल्याने त्यांचे पेन्शन बंद होण्याची भीती आहे.