
-नंदिनी नरेवाडी
कोल्हापूर : मुख्यमंत्री वयोश्री योजनेत कोल्हापुरातून सर्वाधिक १ लाख २० हजार अर्ज दाखल झाले. त्यापैकी केवळ ४० हजार ज्येष्ठ नागरिकांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे. उर्वरित अर्जांची आयुक्तालयातून तपासणी सुरू असून, यापैकी २० हजार अर्ज आधार प्रमाणीकरणामध्ये अडकल्याचे समोर आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेसाठी नवी नोंदणीही ठप्प झाली आहे.