मामाच्या गावी गेलेल्या चिमुकल्याचा गळा दाबून खून; वरदच्या मृतदेहावर टाकला कुंकू-गुलाल, आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा

Kolhapur Crime News : फिर्यादी व वरदचे वडील रवींद्र पाटील (३५, रा. सोनाळी) त्यांचा मेव्हणा प्रथमेश म्हातुगडे यांच्या सावर्डे बुद्रुक येथील घराच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम १७ ऑगस्ट २०२१ ला होता.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Updated on
Summary

घटनास्थळी मिळून आलेल्या वरदच्या मृतदेहावर कुंकू, गुलाल टाकण्यात आले होते. तेथे लिंबूही मिळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याची चर्चा होती.

कोल्हापूर : मामाच्या गावी वास्तुशांतीसाठी गेलेल्या वरद रवींद्र पाटील (वय ७) याचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४६, रा. सोनाळी, कागल) याला न्यायालयाने (Kolhapur Court) मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. अपहरण, खून व पुरावे नष्ट करणे आदी कलमांतर्गत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी त्याला दोषी ठरवले. ऑगस्ट २०२१ मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com