esakal | विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या युवकावर कारवाई; १ पिस्तुलासह २ काडतुसे जप्त,
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या युवकावर पोलीसांची कारवाई

कोल्हापूर: विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या युवकावर पोलीसांची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: विनापरवाना शस्त्र बाळगून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला आज पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सानेगुरूजी येथे सापळा रचून ही कारवाई केली. अजित सुखदेव कांबळे (वय २४, रा.लक्ष्मीटेक परिसर, सानेगुरूजी वसाहत) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १ पिस्तुल २ काडतुसे असा सुमारे ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा: चारा छावणी दफ्तर तपासणीप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याची व्यापक मोहिम हाती घेतली. या अंतर्गत माहिती घेतली असताना कॉन्स्टेबल वैभव पाटील यांना एक तरुण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसारत्यांनी सानेगुरूजी वसाहत येथील रावजी मंगल कार्यालयाजवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. अजित हा येथे शस्त्र विक्रीसाठी आला. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याला जूना राजवाडा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भोसले, नेताजी डोंगरे, श्रीकांत मोहिते, वैभव पाटील, उत्तम सडोलिकर, रणजीत कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजीत पाटील, रफिक आवळकर यांनी केली.

loading image
go to top