
कोल्हापूर : ग्रामीण भागातील केएमटी बस सेवेसाठी प्रत्येक महिन्याला महापालिकेचे एक कोटी ७१ लाख रुपये खर्च होतात. त्यामुळे या २१ मार्गावरील केएमटी बससेवा बंद करा; अन्यथा १६ एप्रिलपासून त्या आम्ही बंद करू, असा इशारा मंगळवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती व समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने दिला.