"देशहितासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांना सूचना दिल्या होत्या; पण त्याबाबत नेतृत्वाने दखल घेतली नाही. ती जर घेतली असती तर देशाची स्थिती वेगळी असती."
आजरा : ‘ स्वातंत्र्यवीर सावरकरांना (Swatantrya Veer Savarkar) सर्व धर्मग्रंथ पूजनीय होते. धर्मग्रंथांतील सर्वच गोष्टी आचरणीय असाव्यात, याबद्दल त्यांचे मतभेद होते. त्या गोष्टींबाबत कालसुसंगत बदलाप्रमाणे आचरण करावे, विज्ञाननिष्ठ धर्म असावा, हे त्यांचे मत होते. सर्वच जातीधर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहावेत, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असावे,’ अशी त्यांची भूमिका होती,’ असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केले.