इचलकरंजी : टाकवडे (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीजवळ (Takawade Gram Panchayat) शिवभक्तांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) रात्रीत विनापरवाना उभारण्यात आल्यानंतर प्रशासनाने हटवण्याची कारवाई केली. यामुळे तीव्र संताप उसळला. ग्रामस्थांनी गाव बंद करत निषेध मोर्चा काढला. स्टँड चौकात ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.