esakal | अखेर 10 तासांनी आजोबांवर झाले अंत्यसंस्कार : पुन्हा एकदा कोल्हापूरात माणुसकीचे दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

after 10 hours corona infected grandfather was cremated for Baitulmal Committee

बैतुलमाल समितीचे योगदान ; व्हॉटसऍपवरील आवाहनाला प्रतिसाद 

अखेर 10 तासांनी आजोबांवर झाले अंत्यसंस्कार : पुन्हा एकदा कोल्हापूरात माणुसकीचे दर्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोविडच्या संकटकाळात मृतदेहाच्या वाट्याला एकाकीपण येत असताना एका व्हॉटसऍप ग्रुपवर आलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तब्बल 10 तासानंतर कोरोनाग्रस्त आजोबांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली. बैतुलमाल समितीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक वसा जोपासत आज आणखी एक जबाबदारी पार पाडली. 


शिवाजी पेठेतील काळकाई गल्ली परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये आज सकाळी आजोबांचा कोरोनाने मृत्यू झाला. आजीही कोरोना पॉझिटीव्ह होत्या. कोरोना मृत्यूमुळे आजोबांचा मृतदेह बाहेर आणण्यास कुणी पुढे आले नाही. आदित्य बेडेकर यांनी कोल्हापूर मिडीया ग्रुपवर यासंबंधी पोस्ट शेअर केली. त्यास कॉंग्रेसचे तरूण कार्यकर्ते तौफिक मुल्लाणी, अब्दुल मलबारी यांनी प्रतिसाद दिला.

हेही वाचा- राजेश क्षीरसागर यांच्या या नंबरीची आहे कार्यकर्त्यांना भुरळ

प्राचार्य डॉ. महादेव नरके, माजी नगरसेवक सचिन चव्हाण हे सातत्याने संपर्कात होते. रोहन स्वामी, संतोष पाटील याकामी पुढे आली. ग्रुपच्या सदस्यांनी अपार्टमेंटचा पत्ता शोधला. दुपारी चारच्या सुमारास आजोबांचा मृतदेह प्लॅस्टिक कागदात गुंडाळून बाहेर काढला. शववाहिका बोलवून तब्बल 10 तासानंतर मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत पाठविला. आजींनाही कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले. एखाद्याने कोरोनाचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी फारसे कुणी पुढे येत नाही. बैतुलमाल समिती सदस्यांनी संकटकाळातही धाडस दाखवून आजपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

संपादन - अर्चना बनगे

loading image
go to top