जनता कर्प्यूच्या घोषणेनंतर खरेदीसाठी उडली झुंबड, दरही कडाडले

After The Announcement Of Janata Curfew, There Was A Rush In Gadhinglaj For Shopping Kolhapur
After The Announcement Of Janata Curfew, There Was A Rush In Gadhinglaj For Shopping Kolhapur
Updated on

गडहिंग्लज : येथील भाजी मंडईत मागणीमुळे फळभाज्या, पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. कोथिंबिरीची आवक वाढू लागल्याने दर पुर्वपदावर येत आहे. फळबाजारात पेरु, डाळिंब, सफरचंदाची आवक कायम असुन दर स्थिर आहेत. उद्यापासून (ता. 7 ) गडहिंग्लज तालुक्‍यात दहा दिवस जनता कर्प्यू असल्याने खरेदीला झुंबड उडाली. परिणामी, मंडईत मागणी वाढली आणि दर कडाडले. सरासरी किलोचा दर 80 रुपयांवर पोहचला. उद्यापासून (ता. 7) 16 सप्टेंबर पर्यंत दहा दिवस जनता कर्फ्यू असल्याने सकाळपासुनच बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडाली. मुख्यतः लक्ष्मी मंदिरालगत भाजीमंडईत तर दुपारपासून पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला.

शहरासह तालुका बंद असल्याने ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात ग्राहक आले होते. कोरोनामुळे मार्चपासून आठवडा बाजार बंद आहे. प्रत्यक्षात खरेदीसाठी गर्दी वाढल्याने आज बाजारपेठेला आठवडा बाजाराचेच स्वरुप आले होते. 

बाजरात पालेभाजी पेढींचा दर 15 रुपयाला एक, तर 25 ला दोन असा होता. कोथिबिर शंभर पेढ्यांना 800 रुपये असा दर होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा दर निम्याने कमी झाला आहे. किळकोळ बाजारात 10 ते 15 रुपये पेंढी अशी विक्री सुरू होती. 

टोमॅटोच्या दरात दहा किलोमागे 100 रुपयांनी वाढ आहे. गाजराची नवी आवक सुरु झाली असुन 40 रुपये किलो असा दर आहे. दहा किलोचा दर असा ः वांगी 300, टोमॅटो 400, प्लॉवर 250, कोबी 100, हिरवी मिरची 400, ढब्बू 500, वरणा 300, दिडगा, कारली 400 रुपये. 

डाळिंबाची आवक अधिक 
फळबाजारात हिमाचल प्रदेश, काश्‍मिर परिसरातून येणाऱ्या सफरचंदाची वाढलेली आवक कायम आहे. दर्जानुसार 80 ते 100 रुपये किलो असा दर आहे. सोलापूर जिल्हातून डाळिंबाची आवक अधिक असुन 40 ते 60 रुपये किलो असा दर आहे. पेरुची आवक टिकून आहे. स्थानिक पपईची आवक चांगली असुन आकारानुसार 15 ते 50 रुपयापर्यंत दर आहेत.

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com