esakal | 'मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सरसकट व्यापारी दुकाने सुरु करु'
sakal

बोलून बातमी शोधा

'मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सरसकट व्यापारी दुकाने सुरु करु'

'मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन सरसकट व्यापारी दुकाने सुरु करु'

sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील (kolhapur district) सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या, यांसह इतर मागण्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित व्यापाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) यांच्याकडे केल्या. पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शहर युनिट वेगळे करून लवकरात लवकर सरसकट व्यापारी दुकाने उघडण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असे स्पष्ट केले. खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवाजी उद्यमनगरातील इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात ही बैठक झाली. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मागण्या मांडल्या.

कोल्हापूर महापालिकेसंदर्भात ज्या समस्या आहेत त्यासंबधी आपण महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी चर्चा केली आहे. त्या संदर्भात उद्या चेंबरच्या शिष्टमंडळाने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समवेत प्रशासकांना भेटावे. तेथे सकारात्मक निर्णय होईल, असे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार जाधव यांनीही ‘इच्छा असूनही शासनाला दुकाने उघडणेस परवानगी देता येत नाही, अशी खंत व्यक्त केली. खासदार मंडलिक यांनी महापालिकेसंदर्भात व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या शासन दरबारी मांडण्याचे कर्तव्य आम्हा लोकप्रतिनिधींचे असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: कोल्हापुरकरांना दिलासा; 40 दिवसानंतर रुग्णसंख्या 1000 च्या खाली

कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांची दुकाने ८० दिवस बंद असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक संकट सहन करावे लागले. शहरातील टेस्टिंग रेट ८.४८ टक्के आला आहे. शहरातील सर्व दुकाने या आठवड्यात सम-विषम पद्धतीने सुरू करणार व पुढील आठवड्यापासून सरसकट सर्व दुकाने सुरू करणार असल्याचेही चेंबरचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितले.

आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, कुलदीप गायकवाड, उज्‍ज्वल नागेशकर, गुरूदत्त देसाई, मुरली रोहीडा, अनिल धडाम, राजूभाई परीख यांनी मनोगत व्यक्त केले. चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार व संजय पाटील, मानद सचिव जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर व राजू पाटील, संचालक अजित कोठारी, प्रशांत शिंदे, विज्ञानंद मुंढे, राहुल नष्टे, शिवराज जगदाळे, तौफिक मुल्लाणी, प्रकाश केसरकर, संपत पाटील, शांताराम सुर्वे, प्रकाश पुणेकर, अविनाश नासिपूडे, रणजित शाह, अभयकुमार अथणे, अरुण सावंत, प्रवीण शहा, सुधीर अग्रवाल व विक्रम निस्सार उपस्थित होते. मानद सचिव धनंजय दुग्गे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा: खासदारांना व्हायचंय आमदार! पद फक्त शोभेचे झाल्याची भावना

काय आहेत मागण्या...

  • आर्थिक वर्ष २०२१-२२ चा घरफाळा माफ करा

  • शहरातील पाणीपट्टी दरवाढ ताबडतोब मागे घ्या

  • परवाना नूतनीकरणाची मुदत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवा

  • परवाना नूतनीकरण मुदत संपल्यानंतर १५ टक्के व २० टक्के दंड आकारणी करू नका

  • फायरसेसची तिप्पट वाढ चुकीची, मागे घ्या

loading image