वैद्यकीय उपचारातील हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर आईसह बाळाचा मृत्यू; रक्तस्त्रावाने प्रकृती बनली होती गंभीर

वैद्यकीय उपचारामधील हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप लक्ष्मी यांचा पती लगमाप्पा हळ्ळी यांनी केला आहे.
Belgaum Hospital
Belgaum Hospitalesakal
Summary

रक्तस्त्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्यांनाही बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बेळगाव : प्रसूतीनंतर मातेचा (Mother) व तिच्या बाळाचा मृत्यू रविवारी (ता. १८) झाला. वैद्यकीय उपचारातील हलगर्जीपणाने दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला असून, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी (Belgaum Rural Police) या प्रकरणाची नोंद संशयास्पद मृत्यू अशी केली आहे. सीआरपीसी १७४ (३) व (चतुर्थ) कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, संतीबस्तवाड येथील रहिवासी लक्ष्मी लगमाप्पा हळ्ळी (वय २९) यांना किणये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तेथे १८ मार्च रोजी प्रसूती व्यवस्थित झाली. मात्र, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बाळाला श्‍वास घेत असताना त्रास जाणविण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बाळाला तातडीने तेथून बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात (Belgaum Hospital) दाखल करण्यात आले.

Belgaum Hospital
Sangli Loksabha : 'शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल'; विश्‍वजित कदमांचा थेट इशारा

याठिकाणी बाळाने उपचाराला व्यवस्थित प्रतिसाद दिला नाही. यामुळे वैद्यकीय उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. तर सोमवारी १८ मार्च रोजी पहाटे किणये येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Health Center) प्रसुतीनंतर लक्ष्मी यांनाही अस्वस्थ वाटण्यास सुरुवात झाली. रक्तस्त्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यामुळे त्यांनाही बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Belgaum Hospital
Chhatrapati Shivaji Maharaj : वाह, क्या बात है! खेडच्या तरुणानं केला तब्बल 800 शिवकालीन प्राचीन नाण्यांचा संग्रह

मात्र, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचाही मृत्यू झाला. वैद्यकीय उपचारामधील हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप लक्ष्मी यांचा पती लगमाप्पा हळ्ळी यांनी केला आहे. यामुळे बाळासह मातेचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याच्या आरोपाखाली बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com