Kolhapur Politics Murlidhar Jadhav
Kolhapur Politics Murlidhar Jadhavesakal

सुजित मिणचेकर, सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंचे कान भरले आणि मला पदावरून हटवलं; माजी जिल्हाप्रमुखांचा गंभीर आरोप

सुजित मिणचेकर हे गेल्या चार वर्षांपासून आपल्याला पदावरून हटवण्यासाठी झगडत आहेत.
Summary

मिणचेकर यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ६७ एकरांचा भूखंड हडपल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

कोल्हापूर : ‘रघुनाथ पाटील, धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी हे शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत राहिले नाहीत. त्यांनी आपली फसवणूक केली आहे. अशा उपऱ्यांना लोकसभेचे तिकीट देऊ नका, अशी मागणी केली होती. त्याचे निमित्त करून डॉ. सुजित मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कान भरले. त्यामुळे मला पदावरून हटवण्यात आले आहे,’ असे मत शिवसेना (ShivSena Thackeray Group) माजी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांनी व्यक्त केले.

मिणचेकर यांनी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ६७ एकरांचा भूखंड हडपल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जाधव म्हणाले, ‘सुजित मिणचेकर हे गेल्या चार वर्षांपासून आपल्याला पदावरून हटवण्यासाठी झगडत आहेत. त्यांना सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा पाठिंबा आहे. मिणचेकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Kolhapur Politics Murlidhar Jadhav
Loksabha Election : महायुतीचं ठरलं! समरजीत घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा, मुश्रीफ कोल्हापुरातून लढवणार लोकसभा?

शिंदे गटात गेल्यानंतर आपले काय होईल, याबद्दल चर्चा करत होते. अंधारे यांनी मिणचेकर यांना जाऊ दिले नाही. याचवेळी मुरलीधर जाधव यांना पदावरून हटवणार असाल तर मी पक्षात थांबतो, असे सांगितले. त्यानंतर हे षड्‌यंत्र रचले गेले. यांना केवळ निमित्त पाहिजे होते. मी माझा हक्क मागत होतो; पण यांना ते रुचले नाही. १९ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो; पण अचानकपणे पक्षाने आपली हकालपट्टी केली.’ हे सांगत असताना श्री. जाधव यांना अश्रू अनावर झाले.

यापुढे शिवसैनिक म्हणून मातोश्री आपले दैवत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राजू शेट्टी, धैर्यशील माने अशा उपऱ्यांना तिकीट न देता निष्ठावंतांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट द्या, ही आपली मागणी चुकीची आहे का? असा सवाल करत डॉ. सुजित मिणचेकर यांनी कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये ६७ एकरांचा भूखंड घोटाळा केला आहे. यांनी शिवसेनेचे कोणतेही प्रतिज्ञापत्र लिहून दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Kolhapur Politics Murlidhar Jadhav
'वंचित' बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, अध्यक्षपदासह माझं मंत्रिपद देईन; आठवलेंची खुली ऑफर

शिवसेनेतच राहणार, आदित्य ठाकरेंचा दौरा यशस्वी करणार

‘मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा यशस्वी करणाऱ्यासाठी पूर्ण ताकद लावणार आहे. मी शिवसेना सोडून कोठेही जाणार नाही’, असेही जाधव यांनी सांगितले.

Kolhapur Politics Murlidhar Jadhav
PM मोदींच्या नेतृत्वात भारत 2047 पर्यंत जगात महासत्ता बनेल; नारायण राणेंनी व्यक्त केला विश्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com