

Congress independent preparation Kolhapur
esakal
Kolhapur Municipal Election : महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे सेनेत कालच झालेली आघाडी उद्या (ता. २६) तुटण्याची शक्यता आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १०, ५, १७ आणि १९ मधील उमेदवारांना संधी मिळत नसल्यामुळे ठाकरे सेनेच्या मुंबईतील वरिष्ठांकडे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आघाडी कायम ठेवायची की तोडायची, या निर्णयासाठी काँग्रेसला उद्या दुपारपर्यंतची ‘डेडलाईन’ दिल्याची विश्वसनीय माहिती आहे.