

Warehouse facility built under the agricultural produce pledge scheme.
sakal
कोल्हापूर : शेतीमालाला चांगला भाव मिळावा, शेती व्यवसायाला बळ देण्यासाठी शेतीमाल तारण योजना आणली. कोट्यवधींचा निधी देऊन गडहिंग्लज बाजार समितीने गोदाम बांधले, पेठवडगाव बाजार समितीत पूरक सुविधा दिल्या; मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिसादाअभावी या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे, तर योजनेचा प्रसार करण्यात बाजार समित्यांच्या पातळीवर उदासीनता आहे. असे परस्पर विरोधी चित्र वर्षानुवर्षे असल्याने योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे.