esakal | आजरा नगराध्यक्ष चषक शाहू सडोली संघाकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

Ajara Nagaradhyaksh Cup Winer Shahu Sadoli Team Kolhapur Marathi News

आजरा येथील नगरपंचायततर्फे आयोजित राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक कबड्डी शाहू सडोली संघाने पटकावला. त्यांनी पुणेच्या आदिनाथ संघाचा पराभव केला. महिलांमध्ये जय हनुमान बाचणी संघाने बाजी मारली. नगराध्यक्ष ज्योस्त्ना चराटी व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

आजरा नगराध्यक्ष चषक शाहू सडोली संघाकडे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आजरा : येथील नगरपंचायततर्फे आयोजित राज्यस्तरीय नगराध्यक्ष चषक कबड्डी शाहू सडोली संघाने पटकावला. त्यांनी पुणेच्या आदिनाथ संघाचा पराभव केला. महिलांमध्ये जय हनुमान बाचणी संघाने बाजी मारली. नगराध्यक्ष ज्योस्त्ना चराटी व मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

येथील व्यंकटराव हायस्कूलच्या मैदानावर सलग चार दिवस स्पर्धा रंगली. रोमहर्षक व रंगतदार लढती झाल्या. पुरुष गटात 16, तर महिला गटात 6 संघ सहभागी झाले होते. महिला गटात स्थानिक हिरण्यकेशी स्पोटर्स क्‍लब व बाचणी संघाचा सामना झाला. पहिल्या टप्प्यात आघाडीवर असलेल्या हिरण्यकेशी महिला संघाला आघाडी टिकवता आली नाही. सांघिक कामगिरीच्या जोरावर बाचणी संघाने हिरण्येशी संघाला पाच गुणांनी हरवले. हिरण्यकेशी संघाची प्रतिक्षा सासुलकर, तेजस्वीनी नार्वेकर यांनी केलेले प्रयत्न अपुरे ठरले.

पुरूष गटातील उपांत्यपुर्व सामन्याच्या लढती रंगतदार झाल्या. शाहू सडोली व जय मातृभूमी सांगलीची लढत बरोबरीत सुटली. त्यामुळे पाच चढाईची लढतीचा सामना घ्यावा लागला. यामध्ये शाहू सडोलीच्या राईडरनी उत्कृष्ट चढाई करून सामना जिंकला. आदिनाथ पुणे संघाच्या सरस कामगीरीमुळे बंड्या मारूती मुंबई संघाचा पराभव झाला. या सामन्यांच्या वेळी प्रेक्षकातून टाळ्या व शिट्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने मैदानावर एक प्रकारे चुरशीचे वातावरण तयार झाले होते. पुरुष गटातील अंतिम सामना शाहू सडोली व आदिनाथ पुणे यांच्यातील लढत अटीतटीची झाली.

चुरशीने झालेल्या या लढतीमध्ये शाहू सडोली यांनी 3 गुणांनी बाजी मारली. स्पर्धेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांचा सत्कार झाला. ज्येष्ठ नगरसेवक अशोक चराटी, अभिषेक शिंपी, अनिरुध्द रेडेकर यांची भाषणे झाली. या वेळी महिला बालकल्याण सभापती अस्मिता जाधव, शिक्षण, क्रीडा सांस्कृतिक कार्य समितीचे सभापती किरण कांबळे, नगरसेविका सुमैय्या खेडेकर, आनंदराव कुंभार,अनिरुध्द केसरकर, धनाजी पारपोलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अशोक बाचुळकर व संदिप देसाई यांनी सुत्रसंचालन केले. 

निकाल असे 
- पुरुष गट (राज्यस्तरीय कब्बड्डी स्पर्धा) : शाहू सडोली, आदिनाथ पुणे, जयमातृभूमी सांगली, बंड्या मारूती मुंबई यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. 
- महीला गट (जिल्हास्तरीय) : जयहनुमान बाचणी, हिरण्यकेशी आजरा, जिजाऊ वडगाव, व्ही. के. चव्हाण - पाटील कार्वे यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. 

loading image