हटला कर्फ्यू, उडाली झुंबड! गर्दीवर नियंत्रण मिळवणे झाले अवघड

हटला कर्फ्यू, उडाली झुंबड! गर्दीवर नियंत्रण मिळवणे झाले अवघड
Updated on

आजरा (कोल्हापूर) : गेले आठ दिवस आजरा शहरात जनता कर्फ्यू (Public curfew)जाहीर केला होता. अत्यावश्‍यक सेवा वगळता कडकडीत लॉकडाऊन(Lockdown) करण्यात आला होता. बुधवारी (ता. १२) जनता कर्फ्यू मागे घेण्यात आल्यानंतर बाजारपेठेत भाजीपाला, (Food)धान्य यासह अत्यावश्‍यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

Ajara taluka covid 19 update marathi news

तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सव्वा महिन्यात आठशेपर्यंत रुग्णांची संख्या पोचली ही चिंतेची बाब आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंदगड व गडहिंग्लज शहरात जनता कर्फ्यू करून कडकडीत बंद पाळला होता. त्यामुळे आजरा बाजारपेठेत गर्दी वाढली होती. त्यामुळे आजरा नगरपंचायतीने गत मंगळवार (ता. ४) पासून शहरात आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेला आठवडाभर अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात कडकडीत लॉकडाउन होता. त्यामुळे आज जनता कर्फ्यू हटल्यानंतर शहरातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.

सकाळी सातपासून अकरापर्यंत नागरिक भाजीपाला व अन्य खरेदीसाठी बाजारपेठेत फिरत होते. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी करू नये, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात येत होते. पोलिसही गर्दी हटवण्यासाठी झटत होते. पुढे आणखी काही दिवस लॉकडाउन होण्याची शक्‍यता असल्याने नागरिकांनी विविध वस्तूंची आतापासून खरेदी करण्यास सुरवात केल्याचे दिसून आले. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्‍य पाटील व सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी कडक पावले उचलली. विनामास्क फिरणाऱ्यांवर व नियम मोडणाऱ्यांच्यावर कडक कारवाई सुरू होती.

कोरोनाचे गांभीर्य ओळखावे

कोरोनाचा प्रादुर्भाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पण गर्दीचे दिसणारे चित्र कोरोनाचा प्रसार होण्यास पुरेसे आहे. त्यामुळे नागरिकांनी गांभीर्य ओळखून काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Ajara taluka covid 19 update marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com