
Kolhapur Sports Department Issue : विभागीय क्रीडा संकुलाचे काम किती वर्षे सुरू आहे? जलतरण तलावात सांडपाणी मिसळते. संबंधितांवर कारवाई होते; मग काम चांगले का होत नाही? काम सुरू असताना त्यावेळचे अधिकारी काय करत होते? त्यांनी लक्ष का दिले नाही? तुम्ही चांगली कामे करणार नसाल, तर तुम्हाला निधी का द्यायचा? शहरातील विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि भविष्याचा विचार करून करा. कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील चांगल्या कामांसाठी निधी कमी पडणार नाही, असेही स्पष्ट केले.